This is Abhijit Ranaware's personal blog. You can share anything with me here.
Monday, December 29, 2008
Friday, October 17, 2008
Thursday, October 16, 2008
Thursday, October 02, 2008
Thursday, September 25, 2008
Tuesday, September 23, 2008
Monday, September 22, 2008
Sherwani (with Chunari and Mojadi) for sell
Check out the following link on kijiji -
http://pune.quikr.com/c-For-Sale-Miscellaneous-Sherwani-with-Chunari-and-Mojadi-for-sell-W0QQAdIdZ63045642

मागोवा जी. डी. बिर्ला यांच्या व्यक्तिमत्त्वाचा
घनश्यामदास तथा जी. डी. बिर्ला (१८९४-१९८३) हे भारतीय उद्योगजगतातील एक प्रमुख नाव. या क्षेत्रातील कार्याबरोबरच इतर अनेक क्षेत्रांत देखील त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा वेध सिंगापूरस्थित भारतीय अभ्यासक मेधा कुदैस्या यांनी बिर्ला यांच्या चरित्राच्या माध्यमातून घेतला आहे.
बिर्ला यांचे कुटुंब हे मुळात व्यापार करणारे घराणे नव्हते. आजोबा शिवनारायण यांनी १८५० च्या दशकात मुंबईस स्थलांतर करून व्यवसायात प्रवेश केला आणि लवकरच अफूच्या व्यापारात आपला जम बसवला. बाराव्या वर्षी आपले वडील बलदेवदास यांच्या हाताखाली मुंबईत व्यवसायात भाग घ्यायला सुरवात केली आणि लवकरच कलकत्त्याला स्थायिक झाले. १९१० मध्ये शिवनारायण यांचे निधन झाले आणि लगेचच बलदेवदास यांनी व्यवसायातून निवृत्ती स्वीकारली. बिर्ला कुटुंबाच्या वाढत्या व्यवसायाची जबाबदारी घनश्यामदास; तसेच त्यांचे दोन थोरले बंधू जुगलकिशोर आणि रामेश्वरदास यांच्यावर पडली. वयाने लहान असले, तरी कालांतराने कुटुंबाच्या व्यवसायातील प्रमुख व्यक्ती म्हणून घनश्यामदास ओळखले जाऊ लागले.
लवकरच त्यांनी कलकत्त्याच्या मारवाडी समाजातील तरुण पिढीतील प्रमुख कार्यकर्ते म्हणून आपले स्थान निर्माण केले. समाजाच्या अनेक संघटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्या काळात बिर्ला आणि त्याच्या सहकाऱ्याचा बंगालमधील क्रांतिकारकांच्या चळवळीशी संबंध आला. एका कटात त्यांचे नाव उघड झाले आणि त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्यामुळे त्यांना काही दिवस अज्ञातवासात घालवावे लागले. त्याच्याचमुळे कदाचित त्यांनी एका मर्यादेपलीकडे सरकारच्या विरोधात जाणे आणि सनदशीर कारवाया सोडणे धोकादायक आहे, असे ठरविले. ही खबरदारी त्यांनी आयुष्यभर पाळली. याच काळात त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत "जूट' (ताग) कारखान्याच्या व्यवसायात इंग्रज कारखानदारांची मक्तेदारी मोडून काढली.
एकूण सार्वजनिक जीवन आणि राजकारणात बिर्ला यांच्यावर चार-तीन व्यक्तींचा प्रभाव पडला. त्या म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय आणि महात्मा गांधी. बिर्ला कुटुंबीयांनी, प्रामुख्याने बनारस हिंदू विद्यापीठाला भरघोस मदत केली. मालवीय आणि लाला लजपत राय यांच्या आग्रहामुळे बिर्ला यांनी १९२६ मध्ये तत्कालीन केंद्रीय कायदे मंडळाची निवडणूक लढविली. १९३० च्या दशकात त्यांच्यावर गांधींचा प्रभाव वाढत गेला. वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांशी संबंध वाढत गेला. सरदार पटेलांशी त्यांचे विशेष सख्य होते, तर पंडित नेहरूंशी मात्र त्यांचे फारसे जमल्याचे दिसत नाही. याच काळात भारतीय उद्योगपतींची अखिल भारतीय शिखर संस्था असावी, यासाठी पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या सहकाराने प्रयत्न केले. त्यामुळेच बिर्ला हे भारतीय उद्योगजगताचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. याच काळात त्यांनी कॉंग्रेस आणि ब्रिटिश सरकार यांच्यादरम्यान अनेक प्रसंगी मध्यस्थाची कामगिरी पार पाडली.
स्वातंत्र्यानंतर सरकारच्या समाजवाद-नियोजनाच्या धोरणावर त्यांनी जशी टीका केली; तसेच प्रमुख नेत्यांशी वैयक्तिक संबंध ठेवत ही धोरणे बोथट करण्यासाठी खटपट केली. अर्थात, या धोरणाचा बिर्लासमूहाच्या वाढीवर कोणताच परिणाम झाला नाही. सरकारशी उघड संघर्षापेक्षा पडद्यामागच्या हालचालींवर भर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील धोरण त्यांनी याही काळात सुरू ठेवले. कॉंग्रेस पक्षाला त्यांनी नेहमीच भरघोस मदत केली. एवढेच नव्हे, तर उद्योगजगताकडून पक्षाला पैसे मिळत राहतील यासाठी प्रयत्न केले. याचे सविस्तर तपशील चरित्रात वाचायला मिळतात. भारतासारख्या देशाला कॉंग्रेससारखा मध्यमवर्गी पक्षच उपयुक्त आहे, अशी त्यांची धारणा होती. पिलानीचे बिर्ला अभियांत्रिकी महाविद्यालय हे त्यांचे शिक्षणक्षेत्रातील प्रमुख योगदान आहे.
अभय दातार - सकाळ

Wednesday, September 10, 2008
कॉफीशॉप - "फर्स्ट फॅमिली'
शंकर-पार्वतीचं विमान नेहमीप्रमाणं आकाशातून चाललं होतं. पुण्यावरून जाताना शंकरांना धक्काच बसला. चिंतातुर होऊन ते म्हणाले, ""अरे, पुण्यनगरीत भूकंप तर झाला नाही ना? आपलं बाळ तिकडं गेलंय सध्या. मला काळजी वाटतेय...'' ......
शंकरांचा पायलट नंदी म्हणाला, ""नाही साहेब, पुण्यात सध्या एक मोठी स्पर्धा होणार आहे, त्याची तयारी चाललीय... म्हणून वरून असं दिसतंय. तुम्ही काळजी करू नका... होईल सगळं व्यवस्थित...''
शंकर म्हणाले, ""अरे, पण एवढं?''
नंदी म्हणाला, ""त्याचं काय आहे साहेब, आमचे गुरुजी सांगत, की फळा जेवढा काळा, तेवढा खडू चांगला उमटतो...''
नंदीचं हे बोलणं भोळ्या शंकरांना काही उमगलं नाही. ते विचारमग्न झालेले पाहून नंदीनं हळूच "पार्वतीच्या बाळा' ही सीडी लावली. ते कव्हर पाहून साहेब भडकले. ""हे सीडीवालेसुद्धा कधी "शंकराच्या बाळा' नावानं सीडी काढणार नाहीत. कायम यांचंच नाव...''
पार्वती मग हसून म्हणाल्या, ""हे घ्या तुमच्यासाठी...'' पार्वतीनं "शंकर महादेवन'ची सीडी दिलेली पाहून शंकर खूष झाले. तीच सीडी लावण्याचा आदेश त्यांनी नंदीला दिला; पण सीडी सुरू करताच "गणदेवताय, गणाधीशाय, गौरीपुत्राय धीमहि' ऐकू यायला लागल्यावर सांबशिवाचा पारा पुन्हा चढला.
""बंद कर... बंद कर आधी ते!'' असं ते ओरडले. शेवटी नंदीनं सीडी बंद केली. शांततेतच प्रवास सुरू झाला. दोघांचीही दोन-तीन दिवसांपासून चिडचिड होत होती, हे नंदी बघत होता. दोघंही आपल्या लाडक्या पोराला "मिस' करीत होते. नंदीलाही करमत नव्हतं. उगाच काही तरी "पीजे' टाकून तो मन रमवण्याचा प्रयत्न करीत होता.
शेवटी शंकर बोलले, ""खरं तर हल्लीच्या काळात त्याला पृथ्वीवर जाऊ द्यायलाच नकोय. पण केवळ लोकांच्या प्रेमाखातर हा निघतो आणि आपल्यालाही त्याचं मन मोडवत नाही. परवाच कान दुखताहेत, म्हणत होता. अश्विनीकुमारांकडं दाखवायला नेईन म्हणेपर्यंत त्याची जायची वेळही आली. या वेळी दुखापत आणखी चिघळू नये म्हणजे झालं. शिवाय हल्ली हे केवळ आवाजाचं प्रदूषण नाही; तर हवेतलंही प्रदूषण किती वाढलंय! याचं नाक हे एवढं मोठ्ठं असूनही श्वास घ्यायला अपुरं पडत असेल. गुदमरत असेल बाळ माझं...''
बाबांचा गदगदलेला स्वर ऐकून आईलाही गहिवरून आलं. ती म्हणाली, ""काही काळजी करू नका. अहो, आता आपला मुलगा मोठा झालाय. त्याला कळतं सगळं. गण कसे सांभाळायचे, हे तुमच्यापेक्षा त्याला छान समजतं. त्याच्या नुसत्या तिथं जाण्यानंच अनेकांच्या बुद्धीत चांगला बदल घडतो. वाईट त्यागून, जो तो चांगला विचार करू लागतो. त्याच्या येण्यासाठी म्हणून तर केवढी वाट पाहत असतात सगळे!...''
तेवढ्यात नंदीला काहीतरी आठवलं. त्यानं लॅपटॉप चालू करून "इनबॉक्स' उघडला. त्याच्या "मेल'वर गणेशाच्या स्वागताचे छान छान फोटो पडले होते. ते पाहून आई-बाबा, दोघंही प्रसन्न झाले. नंदीला म्हणाले, ""घ्या विमान कैलासाकडं... आता त्याची काही काळजी नाही...''
- मामू (सप्तरंग - सकाळ)

Monday, August 25, 2008
ती . बाबा आणि सौ . आईस ,बंड्याचा शि . सा .न .वि .वि .
मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो . तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते.पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल . आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत , तसेच इथे सायकलस्वारांना कोणताही नियम लागू नाही . पोलिसांची नजर चुकवून आणि शिट्टीचा इशारा ऐकून न ऐकल्यासारखे करून हे झक्कासपैकी पसार होतात. काय करणार ! सध्याचे लाइफच धावपळीचे झाले आहे . त्यांचा दोष कसा गं म्हणता येईल आई ?
इथल्या दुचाकीचालकांना ऊर्जाबचतीचे महत्त्व खूपच पटले आहे . त्यांच्या वाहनावरसुद्धा तीन जण आरामात बसतात . सिग्नलपाशी लाल दिवा असला तरी ते सहसा थांबत नाहीत ; कारण त्यामुळे पेट्रोल जास्त जळते . मी कुठेसे वाचले , की वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे. म्हणून हात दाखवायचे कष्ट कोणी घेत नाहीत. शिवाय हात दाखवून अवलक्षण करू नये म्हणतात. त्यामुळेच की काय काही रिक्षाचालक पायाने वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात . आहे ना गंमत ? शाळांचे रिक्षावाले काका खूप प्रेमळ असतात . रिक्षात १२ - १५ मुले घेऊन ते मायेची भूक कशीबशी भागवितात. आई, पुणेकर फार लठ्ठ होऊ लागलेत असा अहवाल मध्यंतरी तू वाचला असशीलच. त्यावर उपाय म्हणून रिक्षावाले फक्त लांब अंतरावरचे प्रवासी स्वीकारतात . बसचालकांनाही पुणेकरांच्या लठ्ठपणाची खूप काळजी वाटते . त्यामुळे ते स्टॉपच्या अलीकडे किंवा पलीकडेच बस थांबवितात.
बाबा , येथील वाहतूक पोलिस पर्यावरणाबाबत सजग आहेत . एक कागद बनविण्यासाठी अनेक झाडे तोडावी लागतात. त्यामुळे नियम तोडणाऱ्याला कागदाची पावती फाडून दंड करणे ते गुन्हाच समजतात . मध्यंतरीच्या वादामुळे मोटारचालकांचा " लेन' या शब्दावर खूप राग आहे . "लेनची शिस्त पाळा ' असा फलक वाचला , की ते हटकून ती सूचना धुडकावतात . बाबा, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मला लायसन्स अगदी होस्टेलपोच मिळाले . कसे ते मात्र गावाला आलो की सांगेन !
( ता . क. - बंटीला मोकळ्या मैदानात सायकल शिकवू नका. मे महिन्यात मी त्याला कर्वे रस्त्यावर दोन दिवसांत शिकवेन)
तुमचा लाडका,
बंड्या!

Thursday, August 14, 2008
Wednesday, August 13, 2008
Thursday, June 26, 2008
Friday, April 11, 2008
Wednesday, March 26, 2008
Won the Diversity Fair again!!
We (ISG, Fianance and HR depts) won the rolling trophy of diversity fair held in our company, Synygy INdia Pvt. Ltd. on Wednesday, 26th March 2008. We have made a hatrick as this was our third consecutive win!!
This time we represented "Janmashtami" of lord ShriKrishna. we got points for the decor, attires, puja, representation, food, etc. We also did "Dahi-Handi" celebration which was an awesome experience. I really enjoyed the event. Thanks to Synygy for providing such a great opportunity and also thanks to all my team-mates for making it happen. :-)
Check below for the pics.
Tuesday, March 18, 2008
Monday, March 17, 2008
Happy Holi!!
Warm wishes for Eid, Holi, Good Friday to all my dear friends and readers.
Have a great festival time!!
Cheers,
Abhijit.
Have a great festival time!!
Cheers,
Abhijit.
Friday, February 22, 2008
Getting Married!
For those dudes who don't know.. I am getting married with a sweet girl - Rupali, on 20th April 2008. I am really in the skies.. Its amazing feeling..
Subscribe to:
Posts (Atom)